यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ विजय भटकर यांना जाहीर

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ विजय भटकर यांना जाहीर

पुणे : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक- अध्यक्ष पद्मविभूषण एन.आर. नारायण मूर्ती यांच्या हस्ते शनिवार, २० जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिला जाणार आहे. ही माहिती पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे.

यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ विजय भटकर यांना जाहीर
यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार डॉ विजय भटकर यांना जाहीर

प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर भूषविणार आहेत.

पुरस्कार निवड समिती

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने डॉ. भटकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

विशेष गौरव

या कार्यक्रमात सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना आणि वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप

पुरस्काराचे हे ३६ वे वर्ष आहे. या पुरस्कारासाठी ३५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि परदेशातही याचा भव्य उपक्रम राबविला जातो. यंदा पुरस्काराची रक्कम एक लाख रूपयांवरून वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. पुरस्कारात सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेल्या बालशिवाजींची प्रतिकृती, या नगरीच्या ग्रामदैवतांसह पुण्यभूषण स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपयांची थैली असे स्वरूप आहे.

Title: This Year, Dr. Vijay Bhatkar Announced as Recipient of the Punya Bhushan Award

Mangesh Wakchaure is a dedicated journalist at puneheadline.com who is known for his expertise in educational articles. They provide accurate and engaging reports.