पुणे : शिक्षण हक्क अधिनियमानुसार, दुर्बल व वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत ७ जून रोजी काढण्यात आली होती.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी २० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी https://student.maharashtra.gov.in/adm या पोर्टलवर उपलब्ध असेल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सोमवार, २२ जुलैपासून नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस येईल.
प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी २३ ते ३१ जुलै दरम्यान, तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रे पडताळून प्रवेश निश्चित करावा.
पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.