शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे विधान भवन येथे जवान किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रु. २५ हजारांची पेन्शन सुरू करा मागणी

पुणे : शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जवान आणि किसानांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. ‘जय जवान जय किसान’च्या नारा देत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या.

शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे विधान भवन येथे जवान किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रु. २५ हजारांची पेन्शन सुरू करा मागणी
शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे विधान भवन येथे जवान किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रु. २५ हजारांची पेन्शन सुरू करा मागणी

प्रमुख मागण्या:

  1. आमदार आणि खासदारांचे निवृत्ती वेतन बंद करावे: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रति महिना पंचवीस हजार रूपये पेन्शन सुरू करावी.
  2. शेतमालावरील निर्यातबंदी रद्द करावी:
  3. शहीद जवानांच्या परिवारासाठी: शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ जमीन पट्टे वाटप करावे आणि त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवांमध्ये सामाविष्ट करावे.
  4. ऊसाच्या भाववाढ: ऊसाला प्रतिटन पाच हजार रूपये भाव द्यावा, अन्यथा इथेनॉल आणि साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द करावी.
  5. कर्जमुक्ती: सर्व कर्ज, विजबील आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करावे.
  6. दूधाच्या भाववाढ: गाईच्या दुधाला डिझेल आणि म्हशीच्या दुधाला पेट्रोल इतका प्रती लीटर भाव द्यावा.
  7. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त: शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा.
  8. सैनिकांच्या भरतीमधील अटी: शिथील करून १५ टक्के आरक्षित जागा तात्काळ भरण्यात याव्यात.
  9. मोफत शिक्षण: सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे.
  10. सैनिकांच्या जमिनींचा वर्ग बदल: सैनिकांना मिळालेल्या शासनाच्या वर्ग २ च्या जमीनींना वर्ग १ मध्ये रूपांतरीत करावे.
  11. प्रतिनिधित्व: सैनिकांचे चार प्रतिनिधी विधानपरीषद आणि राज्यसभेत पाठवावे.
  12. विद्यार्थ्यांवरील अत्याचार: यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. व नीट परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.

मोर्चाचे नेतृत्व:

  • शेतकरी नेते: रघुनाथ पाटील
  • भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष: नारायण अंकुशे

सहभागी:

राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, वीरपत्नी आणि जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि दुचाकी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.

Title: Start a Pension of Rs 25 Thousand to the Families of Farmers: Jawan Kisan Morcha at Pune Vidhan Bhavan by Farmers Association

Mangesh Wakchaure is a dedicated journalist at puneheadline.com who is known for his expertise in educational articles. They provide accurate and engaging reports.