पुणे : आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे.
मोफत उपचार
- गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
- आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
सेवा उपलब्धता
- पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी आणि पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध.
- प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना.
आरोग्य कर्मचारी
६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी सेवा पुरवत आहेत.
तात्पुरती रुग्णालये
- २ हजार ३२७ रुग्णांवर तात्पुरत्या रुग्णालयात उपचार.
- ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता कक्ष (ICU) मुक्कामाच्या ठिकाणी.
फिरत्या ॲम्ब्युलन्स
- मोठ्या ॲम्ब्युलन्स फिरु शकत नसल्याने फिरत्या बाईक ॲम्ब्युलन्स तैनात.
- ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाबासाठी सेवा.
रुग्णवाहिका
१०२ आणि १०८ या रुग्णवाहिका पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत.
आरोग्य कीट
दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले.
हिरकणी कक्ष
स्तनदा मातांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय.