दिल्ली पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट कागदपत्रे आणि UPSC फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

दिल्ली पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट कागदपत्रे आणि UPSC फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला
दिल्ली पोलिसांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध बनावट कागदपत्रे आणि UPSC फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला

याआधी यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावून कागदपत्रांच्या अनियमिततेबाबत उत्तर मागितले आहे. “तुमची उमेदवारी रद्द का करू नये?” अशी विचारणा देखील यूपीएससीने पूजा खेडकर यांना केली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत नोटीस जारी केली आहे.

बनावट कागदपत्रांचा वापर

पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रे निर्माण करून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली, जे नियमांच्या विरोधात असल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाने सांगितले आहे. तसेच खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. आयएएस अधिकारी बनण्यासाठी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही पूजा खेडकर यांनी काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कुटुंबीयांचा सहभाग

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक केली आहे. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे पोलिसांची दुसरी नोटीस

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटलांनी वाशिम विश्रामगृहावर जाऊन खेडकरांना नोटीस दिली आहे. पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे आज दुसरी नोटीस देण्यात आली आहे.

Title: Delhi Police files case against trainee IAS officer Puja Khedkar for forging documents and cheating UPSC

Mangesh Wakchaure is a dedicated journalist at puneheadline.com who is known for his expertise in educational articles. They provide accurate and engaging reports.