घरी टीव्ही बघत असताना आजीसमोर अचानक उभा राहिला बिबट्या: प्रतिकार करून स्वतःला वाचवले – मंचरमधील घटना
मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब आणि लौकी हद्दीवर असलेल्या सुंभेमळ्यात लक्ष्मीबाई खंडू थोरात (वय ७०) या घरी टीव्ही पाहत होत्या. त्यावेळी अचानकपणे बिबट्या घरात शिरला. लक्ष्मीबाई यांनी घाबरून न जाता धैर्याने प्रतिकार केला आणि स्वतःला वाचविले. घाबरून न जाता प्रतिकार लक्ष्मीबाई या गेल्या वर्षभरापासून सुंभेमळा येथे एकट्या राहतात. त्या नेहमीप्रमाणे रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून…