पुणे : सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, शरद मोहोळ हत्या प्रकरण, कुरकुंब ड्रग्ज प्रकरण, आणि बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरण या महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये तपास अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बदलीचे आदेश
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुनील तांबे यांची बदली विशेष शाखेत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवानिवृत्तीपूर्वी बदली
तांबे यांची गतवर्षी ३ जुलै रोजी गुन्हे शाखा १ मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. पुढील काही महिन्यात तांबे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच विशेष शाखेत बदली करण्यात आल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.